फासीवादाचा सामना कसा कराल ? / फासीवाद म्हणजे काय आणि त्याविरुद्ध लढायचे कसे? – सहावा आणि शेवटचा भाग
फासीवाद आणि प्रतिक्रियावाद दहा पैकी नऊ वेळा जातीयवादी, वंशवादी, सांप्रदायिकतावादी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा बुरखा ओढून येतो. तसे तर आपण सुरुवातीपासूनच बुर्झ्वा राष्ट्रवादाच्या प्रत्येक रूपाचा यथासंभव विरोध केला पाहिजे, परंतु विशेषत: फासीवादी सांस्कृतिक अंधराष्ट्रवाद कामगार वर्गाच्या सर्वात मोठ्या शत्रुंपैकी एक आहे. आपल्याला प्रत्येक पावलावर सांस्कृतिक राष्ट्रवाद, प्राचीन हिंदू राष्ट्राच्या प्रत्येक गौरवशाली मिथकाचा आणि खोट्या प्रतीकाचा विरोध करावा लागेल आणि त्यांना जनतेच्या मान्यतेमध्ये खंडित करावे लागेल. ह्यात आपल्याला विशेष मदत ह्या सांस्कृतिक राष्ट्रवाद्यांच्या इतिहासामधून मिळेल. निर्विवादपणे अंधराष्ट्रवादाचा उन्माद पसरवण्यामध्ये गुंतलेल्या ह्या संघटनांना काळा इतिहास असतो जो विश्वासघात, भ्रष्टाचार आणि पतन ह्यांनी भरलेला असतो. आपल्याला फक्त हा इतिहास जनतेपुढे मांडायचा आहे आणि त्याच्या समोर हा प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे “राष्ट्र” कोणते आहे ज्याबद्दल फासीवादी बोलत आहेत ते कोणत्या पद्धतीचे राष्ट्र स्थापन करू इच्छित आहेत आणि कोणाच्या हिताची सेवा करण्यासाठी आणि कोणाच्या हिताचा बळी देऊन ते हे “राष्ट्र” स्थापन करू इच्छित आहेत.