‘हर घर तिरंगा’चे संघ-भाजपचे ढोंग ओळखा!
“हर घर तिरंगा”चा नारा देत घराघरापर्यंत देशभक्तीचे आवतान घेऊन येणाऱ्या मोदी सरकारचा पक्ष, म्हणजे भाजप, ज्या पार्श्वभूमीतून येतो, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास तर आज प्रत्येकाने जाणणे आवश्यक आहे. कारण देशभक्तीचे प्रमाणपत्र देणारे हे स्वघोषित ठेकेदार स्वतः देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आणि त्यानंतरही किती “हाडाचे देशभक्त” होते, तिरंग्याचे “प्रेमी” होते, आणि इंग्रजांचे “विरोधक” होते, याचा इतिहास प्रत्येक भारतीयापर्यंत नक्की पोहोचला पाहिजे.