चुकीच्या कार्यदिशेमुळे पुन्हा एकदा एस.टी. कामगार आंदोलनाच्या पदरी पुन्हा निराशाच!
उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ‘विलिनीकरणाच्या’ न्याय्य मागणीला घेऊन चालू असलेल्या साडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ, चिवट, ऐतिहासिक एस.टी. कामगार आंदोलनाच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. आम्ही ‘कामगार बिगुल’ मध्ये या अगोदर दिलेला इशारा पुन्हा खरा ठरला आहे. सरकारी समितीचा अहवाल विरोधातच येणार आहे हा पहिला इशारा पूर्वीच खरा ठरला होता, आणि आता न्यायालयाकडून विलिनीकरण मिळणार नाही हा दुसरा इशारा सुद्धा खरा ठरला आहे आणि कामगारांच्या पदरी पुन्हा अपेक्षाभंग आला आहे.











