Tag Archives: बबन ठोके

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील सरकारी रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचे मृत्यू

1 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सरकारी रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यात पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सोईसुविधा आणि प्रचंड अनागोंदीचा कारभार उघड झाला आहे.

देवनार डम्पिंग ग्राऊंड : मानखुर्द-गोवंडी मध्ये आरोग्य, प्रदूषणासह नारकीय जीवनाचा अभिशाप

देवनार डम्पिंग ग्राऊंड : मानखुर्द-गोवंडी मध्ये आरोग्य, प्रदूषणासह नारकीय जीवनाचा अभिशाप ✍ बबन .देशातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे डम्पिंग ग्राउंड म्हणून मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राउंडची कुख्याती आहे. मुंबईतील वाढती…

कामगारांची जीवन स्थिती, कामगारांच्या तोंडून. मुक्काम पोस्ट : मंडाळा (मुंबई)

मुंबईतील मोठ्या लोकसंख्येला राहण्याचे पर्याय संपुष्टात येऊ लागल्यावर मुंबईच्या परिघावर असलेल्या मानखुर्द-गोवंडी भागात1980 नंतर झोपडपट्टी वसायला सुरुवात झाली. त्याचबरोबर मानखुर्दमध्ये एका बाजूला वाशीची खाडी आणि दुसऱ्या बाजूला देवनार डम्पिंग ग्राउंड असलेल्या मंडाळा या भागात कोणत्याही प्रकारचे परवाने नसलेले काही छोटे-छोटे कारखाने उभे रहायला सुरुवात झाली. तिथे काम करणाऱ्या कामगारांची जीवन-परिस्थिती व कामाची स्थिती अत्यंत विदारक असल्याचे दिसून येते.

एस.टी कामगार आजही न्यायापासून वंचित का?

एस.टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या न्याय्य मागणीला घेऊन महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात व्यापक आणि 6 महिन्यापेक्षा जास्त दीर्घकाळ चाललेल्या एस.टी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला 11 महिने पूर्ण होऊन देखील एस.टी कामगारांच्या पदरी निराशाच पडली असल्याची सार्वत्रिक स्थिती पाहायला मिळत आहे.  या संबंधाने ‘कामगार बिगुल’ मध्ये आम्ही या अगोदर देखील वेळोवेळी दिलेले इशारे खरे ठरले आहेत.

मोदींची ‘महासत्ता’ करतेय भूकेचे विश्वविक्रम!

‘जागतिक भूक निर्देशांक’(Global Hunger Index) अहवाल दरवर्षी जगभरातील भूक आणि कुपोषणाच्या स्थितीवर प्रसिद्ध केला जातो. वया वर्षीच्या आक्टोंबर 2022 मधील अहवालाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण जगातील एक मोठा हिस्सा भांडवली लुटीमुळे आणि उपासमारीने त्रस्त आहे. या अहवालानुसार 121देशाच्या यादीत भारत सहा क्रमांकांने घसरून 107 क्रमांकावर आला आहे.  तर याच अहवालात हे देखील सांगितले आहे की, नेपाळ (81),बांगलादेश (84), म्यानमार (71)आणि पाकिस्तान (99) भारतापेक्षा चांगल्या स्थानावर आहेत.

सोनी सोरी – 11 वर्षाच्या संघर्षाने उघड केला सत्तेच्या दमनाचा क्रूर चेहरा

15 मार्च 2022 रोजी दंतेवाडा मधील एनआयए विशेष न्यायालयाने आदिवासी अधिकारांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सोनी सोरी यांची पोलिसांकडून लावण्यात आलेल्या खोट्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. संबंधित विशेष न्यायाधीश विनोद कुमार देवांगण यांना एक मार्मिक प्रश्न विचारला, “काय तुम्ही मला माझी 11 वर्ष परत करू शकता का?”

एस.टी. विलिनीकरणाचा लढा: भांडवली पक्षांचे कामगार विरोधी चरित्र झाले उघडे

राजकारण नव्हे तर भांडवली राजकारण आपले शत्रू आहे आणि कामगार वर्गीय राजकारणच आपल्याला योग्य दिशा देऊ शकते. भांडवली पक्षांच्या दावणीला बांधलेल्या संघटनांनी दिलेल्या धोक्यामुळे कामगारांचा एक हिस्सा संघटना संकल्पनेलाच नाकारू लागला आहे. यापेक्षा मोठा आत्मघात दुसरा असू शकत नाही.

दिल्लीतील 2020 मधील धार्मिक हिंसेचा खटला आणि यू.ए.पी.ए. कायद्याचा गैरवापर

दिल्लीतील 2020 मधील धार्मिक हिंसेचा खटला आणि यू.ए.पी.ए. कायद्याचा गैरवापर बबन दिल्लीमध्ये 2020 मध्ये सी.ए.ए., एन.आर.सी. विरोधात चालेलल्या आंदोलनावेळी, हिंदुत्ववाद्यांकडून करवण्यात आलेल्या हिंसेसंदर्भात अनेक खोटे खटले दिल्ली पोलिसांनी भरले आहेत. …

मानखुर्द–गोवंडीत औषधांची वाढती नशाखोरी!

नफ्याकरिता चालणारी बाजारू व्यवस्था एकीकडे दिवसरात्र काम करवून घेऊन कामगारांना उसाच्या चरकातून पिळवटून काढते; तर दुसरीकडे या दैन्यावस्थेचा विसर पडावा म्हणून नशेच्या पदार्थांचा अवैध धंदा करवून कामगार-कष्टकरी-युवक वर्गाच्या मोठ्या हिश्श्याचे मानवी सारतत्त्वही हिरावून घेते.

>

दुर्घटना नाही हत्याकांडाचे सत्र आहे हे!

राज्यासह देशभरातील आरोग्य व्यवस्था किती खिळखिळी आहे हे करोना महामारीत उघडपणे सर्वांच्या लक्षात आले आहे. पण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे चाललेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष व नफेखोरीला मिळत असलेले प्रोत्साहन हे बहुसंख्य समस्यांच्या मुळाशी आहेत.