कामगार वर्गाचा पक्ष कसा असावा (तिसरे पुष्प)
कामगार वर्गाचा पक्ष कामगारांच्या आर्थिक संघर्षांमध्ये सुद्धा सहभागी होतो कारण हा आर्थिक संघर्ष श्रम आणि भांडवलामधील अंतर्विरोधाचीच अभिव्यक्ती असतो आणि त्याला नेतृत्व देऊनच कम्युनिस्ट क्रांतिकारी शक्ती या अंतर्विरोधाला राजकीय अभिव्यक्ती देऊ शकतात, म्हणजेच त्याला भांडवलदार वर्ग आणि सर्वहारा वर्गामधील राजकीय अंतर्विरोधाचे स्वरूप देऊ शकतात












