Category Archives: Slider

28ऑगस्ट, महान जातीविरोधी योद्धे अय्यंकालींच्या जन्मदिनानिमित्त

अय्यंकाली केरळमधील जातिअंताच्या लढाईतले महत्त्वाचे नेते होते ज्यांनी  ब्राह्मणवादाविरुद्ध आणि त्याला पोसणाऱ्या सामंतवाद, ब्रिटीश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. यासाठी त्यांनी सरकारला अर्ज, विनंत्या केल्या नाहीत तर जनतेच्या सामूहिक ताकदीवर विश्वास ठेवून क्रांतिकारी लढे उभे केले. यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्यांनी दाखवून दिले की शोषित जनता फक्त लढू शकते असे नाही तर जिंकू सुद्धा शकते.

मुंबईची हिरवीगार फुफ्फुसे ‘आरे जंगल’ उद्ध्वस्त करून, भांडवलदारांना सोपवण्याची तयारी !!

मुंबईमध्ये ‘आरे जंगल’ वाचवण्याकरिता चालू असलेल्या दुसऱ्या आंदोलनामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांमध्ये नुकताच झळकला. या आंदोलनामध्ये प्रभावी असलेल्या उदारवादी विचारांच्या प्रभावामुळे हे आंदोलन निष्प्रभावी बनले आहे, परंतु या निमित्ताने मुंबईची फुफ्फुसे असलेले आरेचे जंगल उध्वस्त करून ती जागा बिल्डर-उद्योगपतींच्या घशात घालण्याचे फडणवीस-शिंदे सरकारचे इरादे पुन्हा एकदा उघडे पडले आहेत.

कामगार वर्गाचा पक्ष कसा असावा (तिसरे पुष्प)

कामगार वर्गाचा पक्ष कामगारांच्या आर्थिक संघर्षांमध्ये  सुद्धा सहभागी होतो कारण हा आर्थिक संघर्ष श्रम आणि भांडवलामधील अंतर्विरोधाचीच अभिव्यक्ती असतो आणि त्याला नेतृत्व देऊनच कम्युनिस्ट क्रांतिकारी शक्ती या अंतर्विरोधाला राजकीय अभिव्यक्ती देऊ शकतात, म्हणजेच त्याला भांडवलदार वर्ग आणि सर्वहारा वर्गामधील राजकीय अंतर्विरोधाचे स्वरूप देऊ शकतात

संघ-भाजपचे खरे चरित्र ओळखा!

“सबका साथ, सबका विकास” “बेटी बचाओ” सारखे नारे देणाऱ्या, सर्व हिंदूंच्या एकतेचा सतत घोष करणाऱ्या, दहशतवादाला सतत मुद्दा बनवणाऱ्या आणि सतत पूर्वीच्या सरकारांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलणाऱ्या या दुतोंड्या फॅसिस्टांचे कामगार विरोधी, स्त्री-विरोधी, जातीयवादी, दहशतवादी, भ्रष्टाचारी चरित्र नागडे होऊन समोर उभे आहे. भाजपचे समर्थक असलेल्या भांडवलदारांच्या प्रसारमाध्यमांच्या अवाढव्य शक्तीला तोंड देत,  आज जनतेच्या हिमतीवर चालणाऱ्या प्रसारमाध्यमांना उभे करून सत्ताधाऱ्यांचे हे चरित्र उघडे पाडणे आपले कर्तव्य बनले आहे.

तिसरी आघाडी, प्रादेशिक पक्ष, समाजवादी कडबोळे, सर्वधर्मसमभावाबद्दलचे भ्रम सोडा!

मोदी सरकारच्या 8 वर्षांमधील निरंकुश कारभारामुळे देशातील बहुसंख्य जनता नागवली जात असताना, महागाई, बेरोजगारी, गरिबी  नवनवे उच्चांक गाठत असताना,  देशातील “भाजप”ला विरोध करणाऱ्या उदारवाद्यांना टवटवी आणणाऱ्या घटना घडत आहेत. बिहारमध्ये जनता दल (युनायटेड) चे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी भाजपला “चकवा” देत, भाजपसोबत असलेली युती तोडून, लालू-प्रसाद यादव आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत हातमिळवणी केली आहे आणि नवीन सरकार बनवले आहे. सोबतच कॉंग्रेसने “भारत जोडो यात्रा” सुरू केली आहे.  या घडामोडींमुळे पुन्हा एकदा उदारवाद्यांना अचानक भरते आले आहे की आता भाजपला आह्वान उभे राहणे सुरू झाले आहे! 

पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (बारावे आणि अंतिम पुष्प )

कामगारांचे पॅरिस आणि त्यांच्या कम्युनला नव्या समाजाच्या गौरवपूर्ण अग्रदुताच्या स्वरूपात नेहमी लक्षात ठेवले जाईल. कम्युनच्या शहीदांनी कामगार वर्गाच्या हृदयात आपले कायमस्वरूपी स्थान बनवले आहे. कम्युनचा संहार करणाऱ्यांना इतिहासाने नेहमीकरिता आरोपीच्या पिंजऱ्यात असे उभे केले आहे की त्यांच्या पुरोहितांनी कितीही प्रार्थना केली तरी त्यांना सोडवण्यात ते अयशस्वी राहतील.

एन.सी.ई.आर.टी. अभ्यासक्रमात बदल

शोषक वर्गाचे कोणतेही सरकार असो त्यांच्या सोयीनुसार इतिहासाला लपवण्याचे, बदलण्याचे काम नेहमीच करते. या लेखात अभ्यासक्रमात नुकत्याच केल्या गेलेल्या बदलांविषयी जाणून घेऊ तसेच शोषक वर्गाला इतिहासामध्ये मोडतोड करण्याची गरज का पडते हे सुद्धा समजावून घेऊ.

कामगार वर्गाचा राजकीय पक्ष कसा असावा? (पुष्प दुसरे)

कामगार वर्गाच्या पक्षाचा प्रचार क्रांतिकारी असतो. हा प्रचार कामगार वर्ग आणि सामान्य कामकरी जनतेतूनच ठरतो. म्हणजे, क्रांतिकारी प्रचारासाठी योग्य विचार, योग्य नारे, आणि योग्य धोरणे सामान्य कामकरी जनतेच्याच योग्य विचारांना संकलित करून्, त्यांच्यातून योग्य विचारांना छाटून आणि त्यांचे सामान्यीकरण करूनच सूत्रबद्ध केले जाऊ शकतात

दाभोळकर खूनाचा रखडलेला तपास: फॅसिस्ट खुन्यांना वाचवण्याचे कारस्थान

येत्या 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 9 वर्ष पुर्ण होतील. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी तसेच गौरी लंकेश यांच्या हत्येचे उघडपणे ट्विटरवर व अन्य समाज माध्यमांवर फॅसिस्टांकडून स्वागत केले जाते यावरून फॅसिस्टांचा सध्याचा फुगीर बेडरपणा दिसून येतो. आज जनतेची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान देशभरात सुरू असताना अभिव्यक्तीचे धोके पत्करणे आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी झुंजार संघर्ष उभारणे ही दाभोळकरांच्या शहादतीला दिलेली खरी आदरांजली ठरेल.

लोकशाहीची थट्टा चाललेली नाही, ही लोकशाहीच थट्टास्पद आहे!

आता एकनाथ शिंदेंच्या निमित्ताने “बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व”, “पक्षनिष्ठा”,”विजोड युती”, “महाराष्ट्राचे हित” असे शब्द रोज कानावर पडत आहेत, पण यांना खरोखरच “तत्वांची” (हिंदुत्वासारखे धर्मवादाचे मुद्दे कामगार-कष्टकरी वर्गासाठी तत्वाचे मुद्दे नाहीतच, तर आपल्या हिताच्या विरोधातील मुद्दे आहेत!) चाड असती, तर यांनी 2019 मध्येच शिवसेना का सोडली नाही? 2.5 वर्षे सत्तेची मलाई खाल्यानंतर थोडी कमी मलाई मिळतेय असे वाटून यांना सत्ता सोडण्याची उपरती का झाली?