ब्रिटीशांपासून ते फॅसिस्ट भाजप-पर्यंत: ‘टाटा’ नावाच्या एका धूर्त उद्योगसमुहाची कहाणी
‘टाटा’ नावाचा जो उद्योगसमूह आहे तो देशातील उदारवाद्यांच्या नजरेतील ताईत बनलेला आहे, आणि या उद्योगसमूहाला प्रामाणिकपणा, साधेपणा, नैतिकता, देशभक्ती, आणि भांडवलशाहीमध्ये जे काही “शुद्ध” असू शकते त्या सर्वांचे सर्वोत्कृष्ठ उदाहरण म्हणून प्रस्तुत केले जाते. याद्वारे चांगली भांडवलशाही सुद्धा असू शकते या भ्रमालाही खतपाणी घातले जाते. त्यामुळेच, टाटांबद्दलचा हा भ्रम दूर करण्याचे काम आम्ही करत आहोत.