पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प सातवे)
कम्युनने जी ऐतिहासिक पावले उचलली होते, त्यांना घेऊन ती खूप दूरवर जाऊ शकली नाही. जन्मापासूनच ती अशा शत्रूंनी घेरलेली होती जे तिला नेस्तनाबूत करण्यास टपलेले होते. “कम्युनिस्ट घोषणापत्रा”तील शब्दांनुसार म्हाताऱ्या युरोपला कम्युनिझमची जे भूत 1848 मध्येच सतावत होते, त्याला पॅरिस मध्ये समक्ष उभे राहताना बघून युरोपच्या भांडवलदारांचे काळीज चरकले होते.













