Category Archives: Slider

आम आदमी पक्षाचा जनद्रोही इतिहास व भांडवल-धार्जिणे राजकारण : एक दृष्टिक्षेप

‘आम आदमी पक्षा’च्या इतिहासातून त्याचे भांडवली वर्गचरित्र, त्याचे हिंदुत्वधार्जिणे, लोकशाहीविरोधी, कामगार व जनताविरोधी चरित्र, जातीयवादी राजकारण, भ्रष्टाचार-विरोधाचे थोतांड, दिल्ली मॉडेलच्या नावाने मोफत वीज, नवीन शाळा व महाविद्यालये, मोहल्ला क्लिनिकच्या नावाने केलेला फसवा प्रचार आज उघडपणे सर्वांसमोर आले आहेत.

मालकांसाठी स्वस्तात तासन्‌तास राबा: हेच आहे हिंदुराष्ट्र

मोदी सरकारने “अच्छे दिन”चे स्वप्न 9 वर्षांपूर्वी दाखवले होते. आज भारतीय जनता पक्ष त्याचे नावही काढायला तयार नाही, कारण मुठभर उद्योगपतींचे “अच्छे दिन” आणि देशातील कोट्यवधी कामगार-कष्टकरी जनतेचे अत्यंत “बुरे दिन” या सरकारने आणले आहेत हे वास्तव आज लपलेले नाही.  मोदी सरकारचे हे अपयश लपवण्यासाठी, जनतेची दुर्दशा लपवण्यासाठी,  जनतेला भरकटवण्यासाठी पुन्हा एकदा हिंदुत्व फॅसिझमने धर्मवादाचे कार्ड खेळणे चालू केले आहे.

धीरेंद्र शास्त्री सारख्या पाखंडी बाबा बुवांचे भांडवली, फॅसिस्ट, स्त्री विरोधी, जनता विरोधी चरित्र ओळखा!

भक्तांच्या मनातले सगळे प्रश्न त्यांनी न सांगताच ओळखून त्यावर मंत्र जापाचा किंवा तत्सम अवैज्ञानिक उपाय सांगून आपल्या ‘चमत्काराने’ भक्तांना मोहून टाकणारा बागेश्वर सरकार बाबा नागपुरात रामकथा पारायणासाठी आला असतांना त्याच्यावर अंधश्रध्दा निर्मूलन समिती तर्फे अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप आवण्यात आला व त्याला स्वतःच्या दिव्य शक्ती सिद्ध करण्याचे  त्याला आव्हान देण्यात आले; परंतु आव्हान फेटाळून  कार्यक्रम संपण्याच्या निर्धारित वेळेच्या 2 दिवस आधीच बाबा पळून गेला!

समान नागरी कायद्याबाबत कामगार वर्गाचा दृष्टिकोन काय असावा?

समान नागरी कायद्याचा (युनिफॉर्म सिविल कोड) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 9 डिसेंबर रोजी भाजप नेते किरोडी लाल मीणा यांनी राज्यसभेत खाजगी सदस्य विधेयक सादर केले, ज्यामध्ये संपूर्ण देशाच्या स्तरावर समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे म्हटले आहे. भाजपसारख्या फॅसिस्ट पक्षाने समान नागरी कायद्याचे समर्थन करण्यामागे विविध धर्मातील महिलांना समान दर्जा देण्याचा हेतू नसून मुस्लिमविरोधी सांप्रदायिक फॅसिस्ट राजकीय डावपेच आहे, यात शंका नाही. भाजपच्या या मुत्सद्दी-राजकीय खेळीत अडकून विरोधी पक्षांनी लगेचच समान नागरी कायद्याला मुळापासून विरोध सुरू केला. अशा परिस्थितीत कामगार वर्गाने या प्रकरणी कोणती भूमिका घ्यावी, असा प्रश्न उपस्थित होतो.

ब्रिटीशांपासून ते फॅसिस्ट भाजप-पर्यंत: ‘टाटा’ नावाच्या एका धूर्त उद्योगसमुहाची कहाणी

‘टाटा’ नावाचा जो उद्योगसमूह आहे तो देशातील उदारवाद्यांच्या नजरेतील ताईत बनलेला आहे, आणि या उद्योगसमूहाला प्रामाणिकपणा, साधेपणा, नैतिकता, देशभक्ती, आणि भांडवलशाहीमध्ये जे काही “शुद्ध” असू शकते त्या सर्वांचे सर्वोत्कृष्ठ उदाहरण म्हणून प्रस्तुत केले जाते.  याद्वारे चांगली भांडवलशाही सुद्धा असू शकते या भ्रमालाही खतपाणी घातले जाते. त्यामुळेच, टाटांबद्दलचा हा भ्रम दूर करण्याचे काम आम्ही करत आहोत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न: भांडवलदारांच्या आपसातील संघर्षापायी जनतेची फरफट

कर्नाटकात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर डिसेंबर-जानेवारी मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफाळून आला होता. एकमेकांच्या शासकीय बसेस जाळणे, राजकीय घोषणाबाजी आणि राणा-भीमदेवी थाटातील वक्तव्ये, धमक्या, विधानसभांचे ठराव यांचे सत्र पुन्हा एकदा घडून आले. या प्रश्नाला भिजत ठेवून प्रादेशिक अस्मितावादी राजकारणाचे हत्यार म्हणून वापरण्याचा राज्यकर्त्यांचा इरादा तर स्पष्टच आहे. या निमित्ताने हे समजणे गरजेचे आहे की गेली 60 वर्षे राज्यकर्त्या भांडवलदार वर्गाच्या अलोकशाही धोरणांच्या परिणामी हा प्रश्न भिजत पडला आहे आणि त्याचे भोग मात्र सीमाभागातील जनतेला भोगावे लागत आहेत.

क्रांतिकारी कामगार शिक्षण मालिका- 2

मनुष्याच्या जीवनाचे भौतिक उत्पादन आणि पुनरुत्पादन हा कोणत्याही समाजाचा पाया असतो. माणूस जिवंत असेल तरच तो राजकारण, विचारधारा, शिक्षण, कला, साहित्य, संस्कृती, वैज्ञानिक प्रयोग, खेळ, मनोरंजन अशा कार्यात संलग्न होऊ शकतो. मनुष्य आपल्या जीवनाच्या भौतिक उत्पादन आणि पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत निसर्गासोबत एक निश्चित संबंध बनवतो आणि निसर्गात बदल घडवून नैसर्गिक संसाधनांना आपल्या गरजेनुसार रूप देतो. याच क्रियेला आपण उत्पादन म्हणतो.

मोदींची ‘महासत्ता’ करतेय भूकेचे विश्वविक्रम!

‘जागतिक भूक निर्देशांक’(Global Hunger Index) अहवाल दरवर्षी जगभरातील भूक आणि कुपोषणाच्या स्थितीवर प्रसिद्ध केला जातो. वया वर्षीच्या आक्टोंबर 2022 मधील अहवालाने स्पष्ट केले आहे की, संपूर्ण जगातील एक मोठा हिस्सा भांडवली लुटीमुळे आणि उपासमारीने त्रस्त आहे. या अहवालानुसार 121देशाच्या यादीत भारत सहा क्रमांकांने घसरून 107 क्रमांकावर आला आहे.  तर याच अहवालात हे देखील सांगितले आहे की, नेपाळ (81),बांगलादेश (84), म्यानमार (71)आणि पाकिस्तान (99) भारतापेक्षा चांगल्या स्थानावर आहेत.

क्रांतिकारी कामगार शिक्षण माला : पुष्प पहिले

आपण कामगार हे जाणतो की मजुरीच्या सरासरी दरात चढ-उतार होत राहतात. परंतु हे चढउतार एका विशिष्ट मर्यादेच्या आत होतात. या लेखात आपण भांडवलशाही व्यवस्थेत मजुरीमध्ये येणाऱ्या चढउतारांची मूलभूत कारणे काय आहेत आणि मजुरीच्या मर्यादा कशा ठरतात हे समजून घेणार आहोत.

महान ऑक्टोबर सर्वहारा क्रांतीचा वारसा अमर रहे!

25 ऑक्टोबर (क्रांत्योत्तर नवीन कॅलेंडर नुसार 7 नोव्हेंबर) 1917 रोजी लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक पक्षाच्या पुढाकाराने रशियातील कामगार वर्गाने भांडवलदार वर्गाची सत्ता उलथवून टाकली आणि 1871 च्या पॅरिस कम्युन नंतर पुन्हा कामगार वर्गीय सत्तेची स्थापना केली. या घटनेने ना फक्त रशियाच्या इतिहासाला नवीन वळण दिले, तर जगाच्या इतिहासावर कायमची अमिट छाप सोडली आणि इतिहासाच्या संपूर्ण कालक्रमालाच कलाटणी दिली. ऑक्टोबर क्रांतीच्या तोफगोळ्यांचे आवाज जगभर घुमले.