Category Archives: Slider

पंजाब निवडणूक: योग्य पर्यायाच्या अभावी जनतेकडून छद्म पर्यायाची निवड

पंजाबच्या निवडणुकांत दणदणीत विजयानंतर आम आदमी पक्ष काँग्रेसचा राष्ट्रीय पर्याय आणि भाजपचा संभाव्य प्रमुख विरोधक म्हणून चित्रित  केला जाऊ लागला आहे. पण खरंच आम आदमी पक्षाकडे पंजाब आणि एकंदर देशातील कामकरी जनता पर्याय म्हणून बघू शकते का?

श्रीलंका: नवउदारवादाच्या आगीत होरपळतोय आणखी एक देश

आज सर्वात भीषण आर्थिक संकट ज्या देशावर कोसळले आहे तो देश म्हणजे आपला सख्खा शेजारी, श्रीलंका. सुवर्णनगरी, स्वर्गाहून रम्य वगैरे म्हटल्या गेलेल्या ह्या देशात आज परिस्थिती नरकप्राय झालेली आहे. सामान्य कामगार-कष्टकऱ्यांना दोन घास मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे!

रशिया-युक्रेन युद्धात भारताची भुमिका ‘दलाल’ नव्हे ‘स्वतंत्र’ भांडवलदार वर्गाची भुमिका

रशिया-युक्रेन युद्धातील भारताच्या भुमिकेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतातील भांडवलदार वर्गाचे चरित्र एका स्वतंत्र भांडवलदार वर्गाचे आहे आणि तो अमेरिका वा इतर कोण्या साम्राज्यवादी देशांचा ‘दलाल’ भांडवलदार वर्ग नाही.

दिल्लीच्या अंगणवाडी स्वयंसेविकांचा ऐतिहासिक संप

दिल्ली स्टेट अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स युनियनच्या नेतृत्वात दिल्लीचे 22,000 अंगणवाडी कामगार पगारवाढ, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा इत्यादी मागण्यांसाठी दिल्लीच्या कानाकोपऱ्यातील 11,000 अंगणवाडी केंद्रांना टाळे ठोकून सिव्हिल लाईन्स येथे संपावर बसल्या होत्या. गेला महिनाभर चाललेल्या ह्या झुंजार संघर्षाने देशातल्या सर्वच मुख्य राजकीय शक्तींचे पितळ कामगारांसमोर उघडे पाडले आहे.

पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प नववे)

कम्युनच्या जीवन काळात मार्क्सने लिहिले होते. : “जरी कम्युनला नष्ट केले तरी संघर्ष फक्त स्थगित होईल, कम्युनचे सिद्धांत शाश्वत आणि अमर आहेत; जो पर्यंत कामगार वर्ग मुक्त होत नाही तोपर्यंत हे सिद्धांत सतत प्रकट होत राहतील.”

चिले: “समाजवादा”च्या नावाने पुन्हा एकदा फसवे स्वप्न!

गॅब्रियेल बोरिक नावाचा 35 वर्षीय तरुण सर्वाधिक तरुण राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर, त्याच्या “डावे”पणाचे गोडवे गात जगभरातील सामाजिक-जनवादी (समाजवादी) हर्षोल्लसित झाले आहेत आणि तेथील जनतेच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होणार अशा वल्गना केल्या जात आहेत.  शोषणमुक्त समाजाची कल्पना मांडणाऱ्या क्रांतिकारी शक्तींनी या प्रचाराला बळी पडता कामा नये.

क्रिप्टोकरन्सी (कूटचलन): जुगाराचे अजून एक साधन

क्रिप्टोकरन्सी कशी काम करते, ती कागदी चलनापासून वेगळी कशी, ती कामकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी परिवर्तन करू शकते का, हे समजणे हे आवश्यक आहे. तर दुसरीकडे क्रिप्टोकरन्सीच्या मागील भ्रामक वैचारिक धारणा समजून त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने उहापोह करणे आवश्यक आहे

पाच राज्यातील निवडणूक निकाल: पुन्हा एकदा सिद्ध झाले की फॅसिझमला फक्त निवडणुकीच्या मार्गाने हरवणे शक्य नाही!

फॅसिस्टांच्या कॅडर आधारित जन-आंदोलनाला योग्य वैज्ञानिक समजदारीवर आधारित क्रांतिकारी कॅडर आधारित कामगार वर्गीय जन-आंदोलन, म्हणजेच एक योग्य कम्युनिस्ट आंदोलनच खरे उत्तर देऊ  शकते. हे आंदोलन उभे करणे हा आज आपल्यासमोरील सर्वात महत्वाचा कार्यभार बनतो

पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प आठवे)

कम्युनच्या बरबादीचे कारण हे होते की, कम्युनच्या स्थापनेच्या वेळी आणि नतंर दोन्ही वेळेला शिस्तबद्ध, संगटित क्रांतिकारी नेतृत्वाचा अभाव होता. कामगार वर्गाचा कोणताही एकताबद्ध आणि विचारधारात्मक रूपाने मजबुत राजकीय पक्ष नव्हता जो जनतेच्या या प्रारंभिक उठावाचे नेतृत्व करेल.

धर्मसंसदेच्या आडून धार्मिक विद्वेषाची आग पसरवण्याचे हिंदुत्ववादी फॅसिस्टांचे पुन्हा षडयंत्र

आर.एस.एस. आणि त्याच्या सहयोगी कट्टरपंथी संघटनांद्वारे आणि त्यांच्या नेते व कार्यकर्त्यांद्वारे केल्या गेलेल्या विद्वेषी कारवायांना, हिंसेला व भाषणांना नेहमीच सत्तेचे अभय मिळत आलेले आहे