वाढते बलात्कार आणि त्यावरील समाजातील अयोग्य प्रतिक्रियांवर प्रकाश
बलात्कार, ॲसिड अटॅक, घरगुती हिंसा, “एक तर्फी प्रेमातून” होणारी हिंसा, आर्थिक- मानसिक- शारीरिक- लैंगिक शोषण, स्त्रियांच्या शरीराचे होणारे वस्तुकरण, “सौंदर्याच्या” बाजारू कल्पना, वैवाहिक बंधन, मर्यादित स्वातंत्र्य, बेरोजगारी अशा अनेक प्रसंगांना आयुष्यभर स्त्रियांना सामोरे जावे लागते. समाजामध्ये लैंगिक विकृतीसाठी रान मोकळं करून देण्यात भांडवलशाही जबाबदार आहे. स्त्री-पुरुष देहांचा बाजार करून लैंगिक विकृती निर्माण केली जाते ज्या मध्ये अश्लील सिनेमे, गाणी, जाहिराती, व्हिडिओ, फोटो समोर येतात.












