केरळमधील गद्दार ‘डाव्यांचे’ कारनामे – ‘धंद्याच्या सुलभते’ला प्रोत्साहन, आशा कार्यकर्त्यांची दडपणूक, संधीसाधूंचे स्वागत!!
सीपीआय(एम)च्या नेतृत्वाखालील भारतीय संस्थात्मक डाव्यांनी दशकांपूर्वीच मार्क्सवाद सोडून सामाजिक लोकशाहीचा मार्ग स्वीकारला आहे. लेनिन यांनी म्हटले होते की सामाजिक लोकशाही ही कामगार वर्गाची गद्दार आहे, जी स्वतःला कामगार वर्गाचा पक्ष म्हणवत भांडवली धोरणे राबवते. डाव्यांचे हे विश्वासघातकी चरित्र दररोज जनतेसमोर उघड होत आहे. भांडवलासमोर त्यांनी संपूर्ण शरणागती पत्कारली आहे. सत्तेत असताना, ते कामगारांचे शोषण सुरळीत करण्यासाठी भांडवलदार वर्गाचे सहाय्यक म्हणून काम करतात. पक्षाची रचना आणि ट्रेड युनियन वापरून, ते कामगार वर्गाला नियंत्रणाखाली ठेवण्याची शाश्वती देतात.